सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

दैनंदिन परिपाठ मराठी दिनांक 25 नोव्हेंबर 2019

*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
  *🔮TSS🔮TSS🔮TSS🔮* 
      *दिनांक - २५/११/२०१९*
         *वार - सोमवार*
 ▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬      
  *♻♻शालेय परिपाठ♻♻*
      ════════════════════ 

     *🇮🇳🇮🇳राष्ट्रगीत🇮🇳🇮🇳*  ════════════════════ 

   
*जन-गण-मन अधिनायक जय हे,भारत भाग्य विधाता*  
➖➖➖➖➖➖➖➖➖  https://tinyurl.com/y5erxlvn   🎵🎵
 *लेखक :  रवींद्रनाथ टागोर* 
      ════════════════════ 

           *🇮🇳 प्रतिज्ञा 🇮🇳* 
  ════════════════════ 
      
*भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.*..........
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
  ════════════════════       https://tinyurl.com/yyb84px8🎵🎵            ════════════════════                ════════════════════       
 *📙संविधान(प्रास्ताविक) 📙* 
  ════════════════════               
      *आम्ही,भारताचे लोक...*
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet 🎶🎵
 ════════════════════           
       *📙📚सुविचार📙📚*  
  *-विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.*
            *🎗संकलन🎗*

         *श्रीम.मनिषा पांढरे*    
        ════════════════════ 
                                           
    *💫💠प्रार्थना 💠💫*
  🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
♦➖♦➖♦➖♦
 
*असो तुला देवा माझा*

*असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार*
*तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥*

*तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची*
*तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची*
*तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार*
*असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥*

*तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची*
*तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची*
*तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार*
*असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥*

*तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल*
*तरि प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल*
*तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार*
*असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥*

*संकलन-*
*सौ. सुपेकर कल्पना*
*अ. नगर*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 

⭕♾⭕♾⭕♾⭕♾⭕ 
  

♦➿♦➿♦➿♦ 
*श्लोक*

*तडीद्वाससं नीलमेघावभासं रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम्‌ ।*
*वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥*

*अर्थ :* ज्याची वस्त्रे विद्युल्लतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत. ज्याची अंगकान्ती निळ्या मेघाप्रमाणे शोभत आहे, जो श्रीलक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो परमसुंदर चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ आणि जणू काही भक्तांना दर्शन देण्यासाठीच विटेवर सारखी पाऊलें ठेवून उभा आहे अशा त्या परब्रह्मरूपी पांडुंरंगाला मी नमस्कार करतो.

*श्री संजय राठोड सर*


  🔹〰🔹〰🔹〰🔹
    
🌹सुभाषित🌹

*यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वमविवेकिता* |
*एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम*् ||


अर्थ : तारुण्य, श्रीमंती, सत्ता आणि अविचार यापैकी एकटी गोष्ट सुद्धा अनर्थ करण्यास पुरेशी आहे तर जेथे चारही असतील तेथे अनर्थ घडेल हे काय सांगावयास पाहिजे? ════════════════════ 
   
     ⚛⭐ *पंचाग*⭐⚛            
   दिनांक - 25/11/2019
वार-सोमवार
कार्तिक -  कृ. १४
तिथी- कृ. चतुर्दशी 
नक्षत्र - स्वाती 
योग-शोभन
करण-विष्टि 
सुर्योदय-०६.५१
सुर्यास्त ०५. ५९
विक्रम संवत-२०७६
शक संवत-१९४१
*संकलन*- *श्री.किशोर सोनवणे सर* ════════════════════ 
                                                 
        
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
             *🌐दिनविशेष🌐*
     🔹 *⚜ २५ नोव्हेंबर  ⚜*🔹
        ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
  ▪ *हा या वर्षातील ३२९ वा (लीप वर्षातील ३३० वा) दिवस आहे.* 
▪ *पर्यावरण जतन दिन* 
▪ *शाकाहार दिन*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹  महत्त्वाच्या घटना 🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
▪२००० : सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर
▪१९९९ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर
▪१९९४ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ’राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर
▪१९९१ : कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
▪१९७५ : सुरीनामला (नेदरलँड्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१९५२ : इम्रान खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू व राजकारणी
▪१९३९ : उस्ताद रईस खान – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
▪१९२६ : रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)
▪१८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (मृत्यू: ३० मे १९६८)
▪१८७९ : साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
▪१८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, ’नवाकाळ’चे संस्थापक (मृत्यू: २६ ऑगस्ट ),  

*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪२०१३ : लीला पोतदशर तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.  (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)
▪१९९८ : परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष (जन्म: ४ सप्टेंबर  
▪१९१३ - गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
▪१९८४ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १२ मार्च १९१३)
▪१९७४ : यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (जन्म: २२ जानेवारी १९०९)
▪१९६२ : गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. (जन्म: ६ जानेवारी १८६८ - अकोळनेर, अहमदनगर)
▪१९६० : अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
▪१९२२ : पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (जन्म: २० मे ▪१८८४ - राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
▪१८८५ : अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)

⭕  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
        *✍श्री.महेश पराड*
            *भिवंडी महानगरपालिका, ठाणे*   
     ➖➖➖➖➖➖➖➖➖


┄─┅━━▣▣▣━━┅─┄

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

*🎯म्हणी व अर्थ🎯*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे*

_जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातली सोडण्याची पाळी येणे_


✍ *संकलन*✍
*श्री.समाधान अहिरे, मालेगाव नाशिक*
9881181615
                                                                                                  
♾♾💲♾🌹♾💲♾♾
💧💧💧💧💧💧💧💧💧     
🌎  *सामान्य ज्ञान*🌎
     
1) जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
 *:- औरंगाबाद* 
2) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
 *:- कमळ* 
3) आयुर्वेदाचा उगम कोणत्या देशात झाला?
 *:- भारत* 
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯   
 *उमेश राठोड* 
*दिग्रस यवतमाळ*                            *9921454162*                                        https://youtu.be/TwWXBSBBQ4w

════════════════════ 

*🔮🔮बोधकथा🔮🔮*
    ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
           *म्हातारा सिंह*

          एक सिंह फार म्हातारा झाला होता. तो अगदी मरावयास टेकला आहे असे कळताच ज्या प्राण्यांना त्याने त्रास दिला होता ते सगळे सूड घेण्यासाठी तो पडला होता तेथे आले. 
          बैलाने आणि रेड्याने आपली शिंगे रोवून त्याला जखमी केले. कुत्र्याने त्याच्या अंगावर भुंकून त्याला चावे घेतले. रानडुकराने आपले सुळे त्याच्या पोटात खुपसले व शेवटी गाढव पुढे होऊन त्याने त्याच्या तोंडावर लाथा झाडल्या. 
           त्या वेळी मरावयास टेकलेला तो सिंह म्हणाला, 'देवा रे देवा, माझी ही काय स्थिती केली आहेस ?' शूर व पराक्रमी अशा प्राण्यांनाही थरथर कापविणारा जो मी, त्याला आज नीच गाढवाच्या लाथा निमूटपणे सहन कराव्या लागत आहेत. यापेक्षा हजार मृत्यूंचे दुःख मी मोठ्या सुखाने पत्करले असते.'

▪ *तात्पर्य*▪
*आपल्या चांगल्या अवस्थेत आपण इतरांना छळतो, पण जेव्हा आपल्यावर वाईट अवस्था येते तेव्हा अत्यंत क्षुद्रही त्याचा सूड घेतल्याशिवाय राहात नाहीत*

*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण* ════════════════════ 

  
════════════════════ 
     *🇮🇳समुहगीत🇮🇳*
🍂🍂🍂🍂🍃🍂🍂🍂🍂
*🔮तू नव्या जगाची आशा🔮*

*तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा !*
*तपोवनातून तुझ्या उजळली, उपनिषदांची वाणी*
*मातीमधुनी तुझ्या जन्मल्या, नररत्‍नांच्या खाणी*
*जय युग धैर्याच्या देशा, जय नव सूर्याच्या देशा*
*बळापुढेवा छळापुढे, नच इथे वाकल्या माना*
*अन्यायाला भरे कापरे, बघुनी शूर अभिमाना*
*जय आत्मशक्तीच्या देशा,*
*जय त्यागभक्तीच्या देशा*
*श्रमातुनी पिकलेली शेते, पहा डोलती धुंद*
*घामाच्या थेंबातून सांडे, हृदयातील आनंद*

*जय हरितक्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा*
*पहा झोपड्या कंगालांच्या थरथरत्या भवताली*
*अन्यायाला जाळीत उठल्या, झळकत लाख मशाली*
*जय लोक शक्तीच्या देशा. जय दलितमुक्तीच्या देशा*
======================
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
9545482635
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी*
════════════════════ 
        🕉 *पसायदान*🕉                              
  ♾➖♾➖♾➖♾
🌞 *आता विश्वात्मके*🌞
*आतां विश्वात्मकें देवें।* 
*येणें वाग्यज्ञें तोषावें।* 
*तोषोनी मज द्यावें।* 
*पसायदान हें॥ १ ॥*
  *- संत ज्ञानेश्वर महाराज*
      
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬     
 ▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख-*  
*श्री संजय राठोड सर*
*9881268233*

♻♻♻♻♻♻♻
 *परिपाठ एडिटर*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
 *श्री महेश पराड* 
*9271585830*
*श्री समाधान अहिरे*
*9881181615*

✍✒🖊📝

*परिपाठ आयोजक-*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
 *9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
 *9420148419*
*श्री.विश्वंभर बोकडे सर
*9922021066*
*श्रीम गीतांजली गजबे मॅम*
*7776036919*
*श्रीम क्रांती महिरे मॅम*
*7447365876*
📱📱📱📱📱📱📱

  💠 *मुख्य प्रशासक*💠
   *श्री.भालचंद्र भोळे सर* 
*9545482635*
  🌐 *समुहप्रमुख*🌐
    *श्री.नितीन केवटे सर*
 *9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जित रजा अर्ज नमुना / Arjit Raja Arj ,form ,format

 https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk