*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
*🔮TSS🔮TSS🔮TSS🔮*
*दिनांक - ०२/०३/२०२०*
*वार -सोमवार*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*♻शालेय परिपाठ♻* ════════════════════
*🇮🇳🇮🇳राष्ट्रगीत🇮🇳🇮🇳* ════════════════════
*जन-गण-मन अधिनायक जय हे,भारत भाग्य विधाता*
➖➖➖➖➖➖➖➖➖ https://tinyurl.com/y5erxlvn 🎵🎵
*लेखक : रवींद्रनाथ टागोर* ════════════════════
*🇮🇳 प्रतिज्ञा* 🇮🇳 ════════════════════
*भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.*..........
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी* ════════════════════ https://tinyurl.com/yyb84px8🎵🎵 ════════════════════
*📙संविधान 📙* ════════════════════
*आम्ही,भारताचे लोक...*
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet 🎶
════════════════════
*📙📚सुविचार📙*
════════════════════
*“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”*
*🎗संकलन🎗*
*श्रीम.मनिषा पांढरे* ════════════════════
*💫💠प्रार्थना 💠💫*
════════════════════
🌼➖🌼➖🌼➖🌼
*प्रार्थना- अजाण आम्ही तुझी लेकरे*
अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता |
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा |
सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे ||
अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर ||
खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी ,
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी ||
*संकलन-*
*सौ. सुपेकर कल्पना*
════════════════════
*🎼🌼श्लोक🌼🎼*
════════════════════
♦➿♦➿♦➿♦
*"प्रभाते मनी राम चिंतीत जावा।*
*पुढे वैखरी राम आधी वदावा॥*
*सदाचार हा थोर सांडूं नये तो।*
*जनीं तोचि तो मानवी धन्य* *होतो॥"*
*अर्थ:* _पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे. सद्वर्तन थोर असते ते सोडू नये. कारण सदाचारी माणूसच सर्व जनांमध्ये धन्य होतो._
✍ *संकलन* ✍
- *श्री संजय राठोड*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
════════════════════
*❇ ⚛सुभाषित⚛❇*
════════════════════
*ज्ञानशक्तिसमारूढतत्त्वमालाविभूषणे* ।
*भुक्तिमुक्तिप्रदात्रे च तस्मै श्रीगुरवे नम:* ।।
*अर्थ :* _आत्मज्ञानाच्या शक्तीवर आरूढ झालेल्या, तत्त्वज्ञानसमुदायाने अलंकृत असलेल्या, भुक्ति आणि मुक्ति, भोग आणि मोक्ष देणार्या श्रीगुरुंना माझा नमस्कार असो._
*संकलन*
*सौ.वैशाली शिंदे*
*लातूर*
♦➖♦➖♦➖♦
════════════════════
💥 *आजचे पंचांग*💥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹 *दिवस* 02/03/2020
🌺 *वार*- सोमवार
🏵 *फाल्गुन* शु. ०७
⚡ *तिथी* - शु. सप्तमी
🌻 *श्री शालिवाहन शके* - १९४१
♦ *विक्रम संवत्सर* - विकारीनाम
🌳 *ऋतू* - शिशिर
🌓 *पक्ष* - शुध्द
🔹 *योग* - वैध्रुती
💠 *करण* - विष्टी
⭐ *नक्षत्र* - कृत्तिका
🔆 *सुर्योदय*- ०६. ५७
🌞 *सुर्यास्त* - ०६.५६
संकलन - *श्री.किशोर सोनवणे सर नंदुरबार*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*🎯म्हणी व अर्थ🎯*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*दिव्याखाली अंधार :*
*अर्थ :* _मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच._
✍ *संकलन*✍
*श्री.समाधान अहिरे, मालेगाव नाशिक*
9881181615
♾♾💲♾🌹♾💲♾♾
🌎 *सामान्य ज्ञान*🌎
------------------------–-------------
1) प्यार का पौधा अभियान कोणते राज्य सरकार राबवीत आहे? *बिहार*
2) भारतात कोणत्या राज्यात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे?
*केरळ*
3) राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?
*28 फेब्रुवारी*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *उमेश राठोड*
*दिग्रस यवतमाळ* *9921454162*
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• इंग्रजी शब्दार्थ •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) Hand (हॅन्ड) हात
२) Sweet (स्वीट) गोड
३) Book (बुक) पुस्तक
४) Pot (पॉट) भांडे
५) Chair (चेअर) खुर्ची
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• समानार्थी शब्द •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) वारा = वायू, पवन
२) हात = हस्त , कर
३) जल = पाणी
४) सूर्य = भास्कर , रवी
५) जमीन = धरणी, धरती
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• विरुद्धार्थी शब्द •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) श्रीमंत× गरीब
२) खाली × वर
३) ऊन × सावली
४) सोपे × कठीण
५) येणे × जाणे
*✍ संकलन ✍*
*श्री. दिपक कोळी सर (सहशिक्षक)*
*जि.प.प्रा.शा.वाकद केंद्र शेलगाव*
*ता.कन्नड जि.औरंगाबाद*
*मो. नं. 9545960346*
*9689622267*
*ईमेल:-* dkoli978@gmail.com
════════════════════
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🌐दिनविशेष🌐*
🔹 *⚜ २ मार्च⚜*🔹
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
हा या वर्षातील ६१ वा (लीप वर्षातील ६२ वा) दिवस आहे.
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹 महत्वपूर्ण घटना🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪️२००१ : मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
▪️१९६९ : फ्रेन्च बनावटीच्या ’कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या) विमानाचे यशस्वी उड्डाण
▪️१९७८ : स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
▪️१९७० : ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.
▪️१९५६ : मोरोक्कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
▪️१९५२ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन
▪️१९४९ : न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.
▪️१९४६ : हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
▪️१९०३ : ’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’ हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.
▪️१८५७ : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले
▪️१८५५ : अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९७७ : अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू
▪️१९३१ : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (मृत्यू: ३ मे २००९)
▪️१९३१ : मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
▪️१९२५ : शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
▪️१७४२ : विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९९४ : पं. श्रीपादशास्त्री जेरे – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न (जन्म: ? ? ????)
▪️१९८६ : डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते (जन्म: १४ सप्टेंबर १९३२)
▪️१९४९ : सरोजिनी नायडूसरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७९)
▪️१९३० : डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)
▪️१७०० : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
▪️१५६८ : मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई (जन्म: ? ? ????)
⭕ ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री.महेश पराड*
*भिवंडी महानगरपालिका, ठाणे*
➖➖➖➖➖➖➖➖
🔹➖➖🔹➖➖🔹➖➖🔹
♦ *💠💠बोधकथा💠💠*♦
▪┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ▪
*कोल्हा व बोकड*
एक कोल्हा एका विहीरीवर पाणी प्यायला गेला असता विहिरीत पडला. त्याने विहिरीतून वर येण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग होईना. इतक्यात तेथे एक बोकड आला व कोल्ह्याला म्हणू लागला, 'अरे, हे पाणी चांगलं का ?' कोल्हा त्यावर म्हणाला, 'अरे मित्रा, पाणी किती चांगलं आहे म्हणून सांगू ? अगदी अमृताइतकं गोड पाणी आहे हे. कितीही प्यालं तरी माझं समाधान होत नाही.' हे ऐकताच बोकडाने आत उडी मारली. त्याची शिंगे मोठी होती, त्याच्यावर पाय देऊन कोल्हा उडी मारून लगेचच विहिरीतून बाहेर आला व बिचारा बोकड पाण्यात गटांगळ्या खात बुडून मरण पावला.
*तात्पर्य*
- कोणतीही गोष्ट लोक स्वार्थासाठी करतात, मग दुसर्याचा नाश झाला तरी चालेल. म्हणून जो कोणी लालूच दाखवेल त्या माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये.
*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
════════════════════
*🇮🇳समुहगीत🇮🇳*
════════════════════
*🇮🇳बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो🇮🇳*
*हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले*
*राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो*
*वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन*
*तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो*
*हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून*
*ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो*
*करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ*
*विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो*
*या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ*
*हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो*
*ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल*
*जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो*
*कवी : साने गुरुजी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
════════════════════
*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी*
🕉 *पसायदान*🕉
♾➖♾➖♾➖♾
🌞 *आता विश्वात्मके*🌞
*आतां विश्वात्मकें देवें।*
*येणें वाग्यज्ञें तोषावें।*
*तोषोनी मज द्यावें।*
*पसायदान हें॥ १ ॥*
*संत ज्ञानेश्वर महाराज*
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख*
*श्री संजय राठोड सर*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹परिपाठ एडिटर🔹*
*श्री संजय राठोड*
*श्री महेश पराड*
*श्री समाधान अहिरे*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*♦परिपाठ आयोजक♦*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
*9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
*9420148419*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹उप.मुख्य पर्यवेक्षक🔹*
*श्री महेश पराड*
*9271585830*
*श्री कृष्णा कालकुद्रिंकर*
*9420355139*
*श्री महेश कोठावळे*
*96730 63747*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *उप.मुख्य प्रशासक*💠
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *मुख्य प्रशासक*💠
*श्री.भालचंद्र भोळे सर*
*9545482635*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
🌐 *समुहप्रमुख*🌐
*श्री.नितीन केवटे सर*
*9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯