मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

दैनंदिन परिपाठ मराठी 24 डिसेंबर

▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
       ➖📡🆃🆂🆂📡➖
          
 ❱❱ *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र* ❰❰
 ▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻शालेय मराठी परिपाठ♻*
       🗓 *वार -मंगळवार*   
           *दिनांक- 24/12/2019*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगीत*🇮🇳🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖
         *जन गण मन।*                                   
*जनगणमन अधिनायक जय हे भारत  भाग्यविधाता।।*              

*कवि- रविंद्रनाथ टागोर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
 🔊https://tinyurl.com/y5erxlvn 🔊 *राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio 🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
    🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत माझा देश आहे*...

*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge  🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳* 
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬  
*आम्ही भारताचे लोक* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
 
⭕♾⭕♾⭕♾⭕
🔹🔸 *प्रार्थना* 🔸🔹

 *हीच अमुची प्रार्थना*
हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

भोवताली दाटला
अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या
उगवेल आहे खात्री,

तोवरी देई आम्हाला
काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

धर्म, जाती, प्रांत, भाषा
द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा,
एक रंगी रंगू दे

अन् पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके
ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे..
जे थांबले ते संपले

घेतला जो श्वास आता
तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

*संकलन -*
*सौ. सुपेकर कल्पना*
⭕♾⭕♾⭕♾⭕

*_❇🔹सुविचार🔹❇_*
♾➖♾➖♾➖♾➖♾ 
*प्रेमाने जग जिंकता येते.*.            *अर्थ- तुम्ही इतरांचा द्वेष केला तर पुढील व्यक्तीही आपला द्वेषच करणार, तेव्हा पुढील व्यक्तीस प्रेमाने सांगितले तर तुमचे कार्य सहजतेने होते म्हणूनच प्रेमाने जग जिंकता येते असं म्हणतात.*

*✍🏻✒संकलन🖊✍🏻* 
 *श्रीम. मनिषा पांढरे*        ════════════════════
    *❇🌻श्लोक*🌻❇
════════════════════
*नम: समस्तभूतानाम् आदिभूताय भूभृते ।*
*अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे ।।*
*अर्थ :-*
       सर्व प्राणिमात्रांच्या पुर्वीही अस्तित्वात असलेल्या, पृथ्वीला आधारभूत, अनेक रूपांमध्ये व्यक्त होणार्‍या, शक्तिशाली भगवान श्रीविष्णूला माझा नमस्कार असो.

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
  *श्री.संजय राठोड नांदेड* 
〰〰〰〰〰〰〰〰〰
*_⚜🏵सुभाषित🏵⚜_*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडित*ः।
*वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा*।।
*अर्थ:-*
शंभर लोकांमध्ये एकादा शूरवीर असतो, हजार लोकांमधला एकादा पंडित (विद्वान) होतो, दहा हजार लोकांमधला एकजण फर्डा वक्ता असतो, पण (एकादासुद्ध) दानशूर माणूस असेल की नसेल कोण जाणे.

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*                   
    *श्रीम. वैशाली शिंदे लातूर 9422637352*    
➖➖➖➖➖➖➖➖
♦💥 *आजचे पंचांग*💥♦
➖➖➖➖➖➖➖➖
🌹 *दिनांक* 24/12/2019
🌺 *वार*-  मंगळवार 
🏵 *मार्गशीर्ष* कृ.१३
⚡ *तिथी* - कृ. त्रयोदशी 
🌻 *श्री शालिवाहन शके* - १९४१
♦ *विक्रम संवत्सर* - विकारीनाम  
🌳 *ऋतू* - हेमंत 
🌓 *पक्ष* - कृष्ण 
🔹 *योग* - शूल
💠 *करण* - वणिज
⭐ *नक्षत्र* - अनुराधा 
🔆 *सुर्योदय*- ०७.०८
🌞 *सुर्यास्त* - ०६.०७
*✍🏻✒संकलन🖊✍🏻* 
  *श्री किशोर सोनवणे सर 9860915360* 
➖➖➖➖➖➖➖➖➖                         
 💧🌀 *म्हणी व अर्थ*🌀
〰〰〰〰〰〰〰〰〰
*_जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे._*
      
        दुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*   
*श्री.समाधान अहिरे निंबायती ता.मालेगांव नाशिक 9881181615*
〰〰〰〰〰〰〰〰〰
 ➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• इंग्रजी शब्दार्थ •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
       *Fruits  (फ्रुटस्)  फळे*
१) Banana (बनाना) केळी
२) Guava (ग्वाव्हा) पेरु
३) Lime (लाइम्) लिंबू
४) Sweet Lime (स्विट् लाइम्) मोसंबी
५) Fig (फिग्) 
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• समानार्थी शब्द •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) अनाथ = पोरका
२) अपघात = दुर्घटना
३) अभिवादन = नमस्कार , वंदन
४) अरण्य = वन , जंगल , कानन
५) अवघड = कठीण 
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• विरुद्धार्थी शब्द •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) आरंभ × शेवट
२) कष्टाळू × कामचोर
३) खरेदी × विक्री
४) गुण × अवगुण
५) चपळ × सुस्त
          *✍ संकलन ✍*
 *श्री. दिपक कोळी सर (सहशिक्षक)*
 *जि.प.प्रा.शा.वाकद केंद्र शेलगाव*
     *ता.कन्नड जि.औरंगाबाद*
*मो. नं. 9545960346*          
           *9689622267*            
*ईमेल:-* dkoli978@gmail.com
〰〰〰〰〰〰〰〰〰
 *_🌐🌐सामान्यज्ञान🌐🌐_*
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
1) आयुर्वेदाचा उगम कोणत्या देशात झाला?
 *:- भारत* 
2) डास चावल्याने कोणता रोग होतो?
 *:- मलेरिया* 
3) ताजमहल कोणत्या नदीकाठी वसले आहे?
 *:- यमुना* 
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯   
 *उमेश राठोड* 
*दिग्रस यवतमाळ*                            *9921454162*                                        https://youtu.be/TwWXBSBBQ4w
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
             *🌐दिनविशेष🌐*
     🔹 *⚜ २४ डिसेंबर  ⚜*🔹
      ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
  ▪हा या वर्षातील ३५८ वा (लीप वर्षातील ३५९ वा) दिवस आहे.
▪२४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹  महत्त्वाच्या घटना 🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪१९९९ : काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
▪१९७९ : सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
▪१९५१ : लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.
▪१९४३ : दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.
▪१९२४ : अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
▪१९१० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
▪१९०६ : रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.
▪१७७७ : कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१९५९ : अनिल कपूर – हिन्दी चित्रपट कलाकार
▪१९५७ : हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
▪१९२४ : मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (१९६७) (मृत्यू: ३१ जुलै १९८० - मुंबई)
१८९९ : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (मृत्यू: ११ जून १९५०)
▪१८८० : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)
▪१८६४ : विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)
▪१८१८ : जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (मृत्यू: ११ आक्टोबर १८८९)
▪११६६ : जॉन – इंग्लंडचा राजा (मृत्यू: १९ आक्टोबर १२१६)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪२००५ : भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)
▪१९८७ : एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (जन्म: १७ जानेवारी १९१७)
▪१९७७ : नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: २३ मार्च १८९८)
▪१९७३ : पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
▪१५२४ : वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म: ?? १४६९)
⭕  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री.महेश पराड*
        *भिवंडी महानगरपालिका, ठाणे*   
🔹➖➖🔹➖🔹➖➖🔹
♦ *💠💠बोधकथा💠💠*♦
  ▪┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ▪
              *सत्कृत्य*

एका वनात एक पारधी राहत होता. त्‍याने खूप वन्‍य प्राण्‍यांची हत्‍या केली होती. त्‍यामुळे तो खूप पापी झाला होता. त्‍याची चाहूल लागली तरी वन्‍यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्‍या शिकारीच्‍या शोधात असताना एका बेलपत्राच्‍या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्‍याच्‍या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्‍या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्‍याचा उद्योग चालू होता. झाडाच्‍या बुंध्‍याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्‍याला माहित नव्‍हते. त्‍या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्‍या पिंडीवर बेलाच्‍या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्‍न झाले व ते पारध्‍याच्‍या समोर प्रकट झाले. त्‍यांना समोर पाहून पारधी आश्‍चर्यचकित झाला व म्‍हणाला,''महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्‍यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्‍याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्‍न झालात?" यावर महादेव म्‍हणाले,''तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्‍याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्‍कार्य केलेस तर किती फळ मिळेल? पारध्‍याला आपली चूक समजली व त्‍याने आयुष्‍यभर कष्‍ट करून जीवन जगला.

▪ *तात्पर्य*▪
*एका सत्‍कृत्‍यामुळेदेखील आपले आयुष्‍य बदलून जाऊ शकते.*

*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻♻समुहगीत*♻♻
════════════════════
🎹 _*हा देश माझा*_

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे ll धृ ll

हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ll १ ll

जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे ll २ ll

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ll ३ ll
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!"

*कवि - सेनापती बापट* (पांडुरंग महादेव बापट)
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
9545482635
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖      
 🕉 *पसायदान*🕉   

 ➖➖➖➖➖➖➖➖➖       
*आतां विश्वात्मकेंदेवें।*  
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
https://tinyurl.com/Pasaydan-Student  
🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬ 
 *💮शालेय परिपाठ प्रमुख-*  
*श्री संजय राठोड सर*
*9881268233*

♻♻♻♻♻♻♻
 *परिपाठ एडिटर*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
 *श्री महेश पराड* 
*9271585830*
*श्री समाधान अहिरे*
*9881181615*

✍✒🖊📝

*परिपाठ आयोजक-*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
 *9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
 *9420148419*
*श्री.विश्वंभर बोकडे सर*
*9552171724*
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
*श्रीम गीतांजली गजबे*
*7776036919*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
📱📱📱📱📱📱📱

  💠 *मुख्य प्रशासक*💠
   *श्री.भालचंद्र भोळे सर* 
*9545482635*
  🌐 *समुहप्रमुख*🌐
    *श्री.नितीन केवटे सर*
 *9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जित रजा अर्ज नमुना / Arjit Raja Arj ,form ,format

 https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk