▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
➖📡🆃🆂🆂📡➖
❱❱ *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र* ❰❰
▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻शालेय मराठी परिपाठ♻*
🗓 *वार - सोमवार*
*दिनांक - 23/12/2019*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगीत*🇮🇳🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖
*जन गण मन*
*जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता...*
*कवि- रविंद्रनाथ टागोर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔊https://tinyurl.com/y5erxlvn 🔊 *राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio 🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत....*
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge 🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳*
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*आम्ही भारताचे लोक....* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
♾➖♾➖♾➖♾➖♾
*_आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो._*
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्रीम. मनिषा पांढरे*
♾➖♾➖♾➖♾➖♾
⭕💫 *प्रार्थना*💫⭕
♾➖♾➖♾➖♾➖♾
_*गगनसदन तेजोमय*_
*गगन, सदन तेजोमय*
*तिमिर हरून करुणाकर*
*दे प्रकाश, देई अभय*
*छाया तव, माया तव*
*हेच परम पुण्यधाम*
*वार्यातून, तार्यांतुन*
*वाचले तुझेच नाम*
*जगजीवन, जनन-मरण*
*हे तुझेच रूप सदय*
*वासंतिक कुसुमांतून*
*तूच मधुर हासतोस*
*मेघांच्या धारांतुन*
*प्रेमरूप भासतोस*
*कधि येशील चपलचरण*
*वाहिले तुलाच हृदय*
*भवमोचन हे लोचन*
*तुजसाठी दोन दिवे*
*कंठातील स्वर मंजुळ*
*भावमधुर गीत नवे*
*सकलशरण, मनमोहन*
*सृजन तूच, तूच विलय*
🔹 *संकलन* 🔹
*सौ. सुपेकर कल्पना*
*अ. नगर*
♾➖♾➖♾➖♾➖♾
*_❇सुभाषित❇_*
♾➖♾➖♾➖♾➖♾
*यत्र विद्ववज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि* |
*निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते* ||
अर्थ : ज्या ठिकाणी विद्वान लोक नाहीत त्याठिकाणी कमी बुद्धी असणारा माणूस देखील स्तुतीला पात्र ठरतो. जसे [मोठे] वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्रीम. वैशाली शिंदे लातूर 9422637352* ════════════════════
*❇🌻श्लोक*🌻❇
════════════════════
*प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।*
*भक्तावासं स्मरेन्नित्यं आयु:कामार्थसिद्धये ।।*
*अर्थ :*
आपले आरोग्य आणि मनोकामना यांच्या सिद्धीसाठी नेहमी गौरीपुत्र, भक्तांना आश्रयभूत अशा विनायकाला सविनय वंदन करून त्याचे स्मरण करावे.
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री.संजय राठोड नांदेड*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*⚛♻पंचांग♻⚛*
〰〰〰〰〰〰〰〰〰
दिनांक - 23/12/2019
वार- सोमवार
मार्गशीर्ष - कृ.१२
तिथी- कृ. द्वादशी
नक्षत्र - विशाखा
योग-ध्रुती
करण-तैतिल
सुर्योदय-०७. ०८
सुर्यास्त ०६.०७
विक्रम संवत-२०७६
शक संवत-१९४१
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री किशोर सोनवणे सर 9860915360*
➖➖➖➖➖➖➖➖➖
💧🌀 *म्हणी व अर्थ*🌀💧
〰〰〰〰〰〰〰〰〰
*_जलात राहुन माशांशी वैर करू नये._*
_ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये._
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
*श्री.समाधान अहिरे निंबायती ता.मालेगाव 9881181615*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• इंग्रजी शब्दार्थ •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) Duck (डक्) बदक
२) Cow (काऊ) गाय
३) Rabbit (रॅबिट्) ससा
४) Stick (स्टीक) काठी
५) Onion (ऑनियन्) कांदा
*✍ संकलन ✍*
*दिपक कोळी सर (सहशिक्षक)*
*जि.प.प्रा.शा.वाकद ता.कन्नड जि.औरंगाबाद*
*9545960346*
*9689622267*
dkoli978@gmail.com
〰〰〰〰〰〰〰〰〰
🌎 *सामान्य ज्ञान*🌎
〰〰〰〰〰〰〰〰〰
1) जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
*:- औरंगाबाद*
2) मोटर सायकलचा शोध कोणी लावला?
*:- जी डेम्लर*
3) शून्याचा शोध कोणी लावला?
*:- आर्यभट्ट*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*उमेश राठोड*
*दिग्रस यवतमाळ* *9921454162* https://youtu.be/TwWXBSBBQ4w
════════════════════
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🌐दिनविशेष🌐*
🔹 *⚜ 23 डिसेंबर⚜*🔹
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪हा या वर्षातील ३५७ वा (लीप वर्षातील ३५८ वा) दिवस आहे.
▪राष्ट्रीय किसान दिन
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹 महत्त्वाच्या घटना 🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
▪२००० : कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
▪१९७० : धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
▪१९५४ : डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
▪१९५४ : बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
▪१९४७ : अमेरिकेतील ’बेल रिसर्च लॅब्ज’ या संशोधन संस्थेने ’ट्रॅन्झिस्टर’ या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.
▪१९४० : वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
▪१९२१ : शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
▪१९१४ : पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो (इजिप्त) येथे आगमन.
▪१८९३ : ’हॅन्सेल अॅंड ग्रेटेल’ या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१९०२ : चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १९८७)
▪१८९७ : कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार (मृत्यू: ? ? ????)
▪१८५४ : हेन्री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪२०१० : के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (जन्म: ५जुलै १९१६)
▪२०१० : ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ’पाऊस’, ’भरती’, ’चिद्घोष’,हे कथासंग्रह, ’दोन बहिणी’, ’ ’कोंडी’ या कादंबर्या व ’पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २१ मे १९२८)
▪२००८ : गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (जन्म: ३१ जानेवारी १९३१)
▪२००४ : नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (जन्म: २८ जून १९२१)
▪२००० : ’मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ - कसुर, पंजाब, भारत)
▪१९९८ : रत्नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ - निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)
▪१९७९ : दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी) (जन्म: ? ? ????)
▪१९६५ : गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (जन्म: २ जुलै १८८०)
▪१९२६ : स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)
▪१८३४ : थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)
⭕ ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री.महेश पराड*
*भिवंडी महानगरपालिका, ठाणे*
════════════════════
*🌐🌐बोधकथा🌐🌐*
════════════════════
*कष्टाची कमाई*
एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला, तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.
▪ *तात्पर्य*▪
*पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.*
*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻♻समुहगीत*♻♻
════════════════════
🎹 _*हा देश माझा*_
हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे ll धृ ll
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ll १ ll
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे ll २ ll
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ll ३ ll
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!"
कवि - सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
Bncmc School no 93, *चाविन्द्रा भिवंडी*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🕉 *पसायदान*🕉
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आतां विश्वात्मकेंदेवें।*
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://tinyurl.com/Pasaydan-Student
🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख-*
*श्री संजय राठोड सर*
*9881268233*
♻♻♻♻♻♻♻
*परिपाठ एडिटर*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
*श्री महेश पराड*
*9271585830*
*श्री समाधान अहिरे*
*9881181615*
✍✒🖊📝
*परिपाठ आयोजक-*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
*9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
*9420148419*
*श्री.विश्वंभर बोकडे सर*
*9552171724*
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
*श्रीम गीतांजली गजबे*
*7776036919*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
📱📱📱📱📱📱📱
💠 *मुख्य प्रशासक*💠
*श्री.भालचंद्र भोळे सर*
*9545482635*
🌐 *समुहप्रमुख*🌐
*श्री.नितीन केवटे सर*
*9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा