सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

दैनंदिन परिपाठ मराठी दिनांक 10 डिसेंबर 2019

▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
       ➖📡🆃🆂🆂📡➖
          
 *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र* 
 ▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻♻शालेय परिपाठ♻♻*
🗓 *वार -मंगळवार*   
*दिनांक -- 10/12/2019* 
  *मराठी परिपाठ*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
       🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगीत*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
         *जन गण मन।*                                   
*जनगणमन अधिनायक जय हे भारत  भाग्यविधाता।।*              
*कवि- रविंद्रनाथ टागोर*

 🔊https://tinyurl.com/y5erxlvn   🔊 
 *राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio     🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
         🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत*...
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge  🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳* 
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬  
*आम्ही , भारताचे लोक .* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
➖➖➖➖➖➖➖                                            
    *💫💠प्रार्थना 💠💫*     
🌼➖🌼➖🌼➖🌼➖🌼 
   🌷 *करितो प्रार्थना हे दाता तुज*🙏
*करितो प्रार्थना हे दाता तुज, मंगलता ही लाभो*
*ज्ञान कणांनी वर्षुनी आम्हा विनम्रता ही लाभो ||धृ||*

*दे बुद्धी दे, दे शक्ती दे, दे आशीष दे तू सर्वांना*
*दे युक्ती दे, दे भक्ती दे, घे चरणी घे तू सर्वांना*
*विनंती करितो, हे दाता तुज, कोमलता ही लाभो ||१||*

*दे सद्बुद्धी, दे समृद्धी, ने प्रगतीस्तव तू सर्वांना*
*विश्वबंधुता विश्वएकता, दे ही भावना तू सर्वांना*
*करितो कामना हे दाता तुज.* *विश्वशांतता ही लाभो ||२||*

*🎗संकलन🎗*
*सौ. सुपेकर कल्पना अ.नगर*

⭕♾⭕♾⭕♾⭕♾⭕ 
   *🎼🌼श्लोक🌼🎼* 
 〰〰〰〰🎀〰〰〰〰
*मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।*
*मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥*
*मना कल्पना ते नको वीषयांची।*
*विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥*
 
*अर्थ:-*
       _पापकर्म करण्याचे मनात आणू  नये. नेहमी सदाचाराचाच संकल्प मनात धरावा. विषयवासना मनात असू नये कारण त्यामुळे लोकांमध्ये छी थूच होते._
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯   
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
  *श्री.संजय राठोड* 
════════════════════ 
        *❇ ⚛सुभाषित⚛❇* 
════════════════════   
*नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम*|
*आपत्स्वपि न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धय*: ||

_*अर्थ* : विद्वान् माणसे न मिळण्याजोग्या [अशक्य] गोष्टीची इच्छा करीत नाहीत, नाश पावलेल्या गोष्टीबद्दल दुःख करीत नाहीत आणि संकटकाळी डगमगत नाहीत._
*✍🖋संकलन🖋* 
  ✍ *श्री. वैशाली शिंदे लातूर 9422637352*       ════════════════════ 
           ⚛⭐ *पंचाग*⭐⚛             ════════════════════ 
दिनांक - 10/12/2019
वार-मंगळवार 
मार्गशीर्ष -  शु.१३
तिथी- शु. त्रयोदशी 
नक्षत्र - कृत्तिका 
योग-शिव 
करण-तैतिल 
सुर्योदय-०७. ०१
सुर्यास्त ०६.०१
विक्रम संवत-२०७६
शक संवत-१९४१

*🖋संकलन🖋* 
  ✍ *श्री. किशोर सोनावणे*  ✍                                                        ════════════════════    
        ⚛⭐ *सुविचार*⭐⚛                 ════════════════════ 
*जीवनात दोनच गोष्टी मागा , आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको.*
 
*✍🖋संकलन🖋* 
✍ *श्रीमती मनिषा पांढरे*  ✍
════════════════════      
         *🎯म्हणी व अर्थ🎯*  
════════════════════ 
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*कानामागून आली नि तिखट झाली*

_*अर्थ*- मागून येऊनही प्रसिद्ध पावणे._
✍ *संकलन*✍
*श्री.समाधान अहिरे, मालेगाव नाशिक*
9881181615                                                                                                ♾♾💲♾🌹♾💲♾♾ 
════════════════════
         🌎 *सामान्य ज्ञान*🌎
════════════════════      
 1) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
 *:- नाशिक* 
2) मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
 *:- पहिला* 
3) मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
 *:-  औरंगाबाद* 
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯   
 *उमेश राठोड* 
*दिग्रस यवतमाळ*                            *9921454162*      https://youtu.be/md_n8z22NQ8
════════════════════ 
          ⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
             *🌐दिनविशेष🌐*
     🔹 *⚜ १० डिसेंबर⚜*🔹
        ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
  ▪हा या वर्षातील ३४४ वा (लीप वर्षातील ३४५ वा) दिवस आहे.
▪जागतिक मानवी हक्क दिवस
▪अल्फ्रेड नोबेल दिवस
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹  महत्त्वाच्या घटना 🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
▪२०१४ : भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
▪२००८ : प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
▪१९७८ : ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
▪१९१६ : ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
▪१९०६ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
▪१९०१ : नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
▪१८६८ : पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.

*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१८९२ : व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च १९३७)
▪१८८० : डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ - पुणे)
▪१८७८ : चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)
▪१८७० : सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार (मृत्यू: १९ मे १९५८)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪२००९ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)
▪२००३ : श्रीकांत ठाकरे – संगीतकार (जन्म: ? ? ????)
▪२००१ : अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ आक्टॊबर १९११)
▪१९६४ : शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)
▪१९६३ : सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५)
▪१९५५ : आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)
▪१९२० : होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८)
▪१८९६ : अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर 
⭕  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
        *✍श्री.महेश पराड*
            *भिवंडी महानगरपालिका, ठाणे*   
     ➖➖➖➖➖➖➖     ════════════════════ 
      *🔮📖बोधकथा📖🔮*
════════════════════ 
       🐍 *साप आणि खेकडा* 🦀
एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही.

एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ?

*तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.*

*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
     
════════════════════ 
           *🇮🇳समुहगीत🇮🇳*
════════════════════ 
*🇮🇳बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो🇮🇳* 

*बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो*

*हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले*
*राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो*

*वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन*
*तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो*

*हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून*
*ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो*

*करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ*
*विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो*

*या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ*
*हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो*

*ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल*
*जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो*
*कवी : साने गुरुजी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
Bncmc School no 93, चाविन्द्रा भिवंडी
════════════════════ 
        🕉 *पसायदान*🕉                              
  ♾➖♾➖♾➖♾
🌞 *आता विश्वात्मके*🌞
*आतां विश्वात्मकें देवें।* 
*येणें वाग्यज्ञें तोषावें।* 
*तोषोनी मज द्यावें।* 
*पसायदान हें॥ १ ॥*
  *- संत ज्ञानेश्वर महाराज*
      
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख💮*  
*श्री संजय राठोड नांदेड*

♻♻♻♻♻♻♻
 *परिपाठ एडिटर*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
 *श्री महेश पराड* 
*9271585830*
*श्री समाधान अहिरे*
*9881181615*
✍✒🖊📝

*परिपाठ आयोजक-*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
 *9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
 *9420148419*
*श्री.विश्वंभर बोकडे सर*
*9552171724*
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
*श्रीम गीतांजली गजबे मॅम*
*7776036919*
*श्रीम क्रांती महिरे मॅम*
*7447365876*
📱📱📱📱📱📱📱

  💠 *मुख्य प्रशासक*💠
   *श्री.भालचंद्र भोळे सर* 
*9545482635*
  🌐 *समुहप्रमुख*🌐
    *श्री.नितीन केवटे सर*
 *9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जित रजा अर्ज नमुना / Arjit Raja Arj ,form ,format

 https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk