सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

दैनंदिन परिपाठ मराठी दिनांक 09 डिसेंबर 2019

▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
       ➖📡🆃🆂🆂📡➖
          
 *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र* 
 ▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻♻शालेय परिपाठ♻♻*
🗓 *वार -सोमवार*   
*दिनांक -- 09/12/2019* 
  *मराठी परिपाठ*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
       🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगीत*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
         *जन गण मन।*                                   
*जनगणमन अधिनायक जय हे भारत  भाग्यविधाता।।*              
*कवि- रविंद्रनाथ टागोर*

 🔊https://tinyurl.com/y5erxlvn   🔊 
 *राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio     🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत*...
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge  🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳* 
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬  
*आम्ही , भारताचे लोक .* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
➖➖➖➖➖➖➖                                            
    *💫💠प्रार्थना 💠💫*     
🌼➖🌼➖🌼➖🌼➖🌼 
 *देह मंदिर चित्त मंदिर* 

*देह मंदिर चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना |*
*सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||*

*दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना*
*वेदना जाणावयाला जागवू संवेदना*
*दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना ||१||*

*जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना*
*सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना*
*शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना ||२||*

*भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना*
*मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना*
*मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना ||३||*
  
*🎗संकलन🎗*
*सौ. सुपेकर कल्पना अ.नगर*

⭕♾⭕♾⭕♾⭕♾⭕ 
   *🎼🌼श्लोक🌼🎼* 
 〰〰〰〰🎀〰〰〰〰
*मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।*
*तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥*
*जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।*
*जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥*
 
*अर्थ:-*
             _हे सज्जन मना, नेहमी भक्तिमार्गाने गेले म्हणजे साहजिकच परमेश्वर पावतो. तेव्हा लोकांकडून ज्याची ज्याची निंदा होईल असे सर्व काही सोडून द्यावे आणि लोकाना जे जे वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे._
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯   
*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
  *श्री.संजय राठोड* 
════════════════════ 
*❇ ⚛सुभाषित⚛❇* 
════════════════════   
*वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छकस्य विशेषत*ः |
*प्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत*्‌ ||

_अर्थ : ज्याचा [आपल्यावर] विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला [त्याबद्दल] विचारलेले आहे अशा [माणसालाच उपदेश] सांगावा पण विश्वास नसणाऱ्याला सांगितले तर ते कष्ट व्यर्थ जातील._
*✍🖋संकलन🖋* 
  ✍ *श्री. वैशाली शिंदे लातूर 9422637352*       ════════════════════ 
  ⚛⭐ *पंचाग*⭐⚛             ════════════════════ 
दिनांक - 09/12/2019
वार-सोमवार
मार्गशीर्ष -  शु.१२
तिथी- शु.द्वादशी 
नक्षत्र - भरणी 
योग-परिघ 
करण-बालव 
सुर्योदय-०७. ००
सुर्यास्त ०६.०१
विक्रम संवत-२०७६
शक संवत-१९४१

*🖋संकलन🖋* 
  ✍ *श्री. किशोर सोनावणे*  ✍                                                        ════════════════════    
 ⚛⭐ *सुविचार*⭐⚛                 ════════════════════ 
*दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे.तो नेहमी विचारच परावर्तित करतो.*
 
*✍🖋संकलन🖋* 
✍ *श्रीमती मनिषा पांढरे*  ✍
════════════════════      
      *🎯म्हणी व अर्थ🎯*  
════════════════════ 
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार|* 

_*अर्थ :* मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात._
✍ *संकलन*✍
*श्री.समाधान अहिरे, मालेगाव नाशिक*
9881181615                                                                                                ♾♾💲♾🌹♾💲♾♾
🌎 *सामान्य ज्ञान*🌎
════════════════════      
 1) मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात?
 *:- 42* 
2) मासे कोणत्या इंद्रियांद्वारे श्वसन करतात?
 *:- कल्ले* 
3)भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?
 *:-  मीरा कुमार* 
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯   
 *उमेश राठोड* 
*दिग्रस यवतमाळ*                            *9921454162*      https://youtu.be/md_n8z22NQ8
════════════════════ 
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
             *🌐दिनविशेष🌐*
     🔹 *⚜ ९ डिसेंबर⚜*🔹
        ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
 ▪ हा या वर्षातील ३४३ वा दिवस आहे. (लीप वर्षातील ३४४ वा)
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹  महत्त्वाच्या घटना 🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
▪१९९५ : बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ
▪१९७१ : संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
▪१९६६ : बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
▪१९६१ : ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म
▪१९०० : लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.
▪१७५३ : थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला.
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१९४६ : सोनिया गांधी – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी 
▪१९४६ : शत्रुघ्न सिन्हा – चित्रपट अभिनेते व खासदार
▪१८७८ : अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५०)
▪१८६८ : फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ - बाझेल, स्वित्झर्लंड)
▪१६०८ : जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१९९७ : के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० आक्टोबर १९०२ - कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
▪१९४२ : डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० आक्टोबर १९१०)
⭕  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
        *✍श्री.महेश पराड*
            *भिवंडी महानगरपालिका, ठाणे*   
     ➖➖➖➖➖➖➖     ════════════════════ 
 *📖📖बोधकथा📖📖*
════════════════════ 
       🔮  *विश्वासघात* 🔮
     जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल !

▪ *तात्पर्य*▪
*जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.*

*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
     
════════════════════ 
     *🇮🇳समुहगीत🇮🇳*
════════════════════ 
*🇮🇳बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो🇮🇳* 

*बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो*

*हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले*
*राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो*

*वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन*
*तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो*

*हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून*
*ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो*

*करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ*
*विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो*

*या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ*
*हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो*

*ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल*
*जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो*
*कवी : साने गुरुजी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
Bncmc School no 93, चाविन्द्रा भिवंडी
════════════════════ 
        🕉 *पसायदान*🕉                              
  ♾➖♾➖♾➖♾
🌞 *आता विश्वात्मके*🌞
*आतां विश्वात्मकें देवें।* 
*येणें वाग्यज्ञें तोषावें।* 
*तोषोनी मज द्यावें।* 
*पसायदान हें॥ १ ॥*
  *- संत ज्ञानेश्वर महाराज*
      
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख💮*  
*श्री संजय राठोड नांदेड*

♻♻♻♻♻♻♻
 *परिपाठ एडिटर*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
 *श्री महेश पराड* 
*9271585830*
*श्री समाधान अहिरे*
*9881181615*
✍✒🖊📝

*परिपाठ आयोजक-*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
 *9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
 *9420148419*
*श्री.विश्वंभर बोकडे सर*
*9552171724*
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
*श्रीम गीतांजली गजबे मॅम*
*7776036919*
*श्रीम क्रांती महिरे मॅम*
*7447365876*
📱📱📱📱📱📱📱

  💠 *मुख्य प्रशासक*💠
   *श्री.भालचंद्र भोळे सर* 
*9545482635*
  🌐 *समुहप्रमुख*🌐
    *श्री.नितीन केवटे सर*
 *9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जित रजा अर्ज नमुना / Arjit Raja Arj ,form ,format

 https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk