शुक्रवार, २० मार्च, २०२०

16 मार्च Marathi

*📱तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र📱*
  *🔮TSS🔮TSS🔮TSS🔮* 
      *दिनांक - १६/०३/२०२०*
         *वार: सोमवार*  
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬     
              *♻शालेय परिपाठ♻*    ════════════════
*🇮🇳🇮🇳राष्ट्रगीत🇮🇳🇮🇳*  ═════════════════  
*जन-गण-मन अधिनायक जय हे,भारत भाग्य विधाता*  
➖➖➖➖➖➖➖➖➖  https://tinyurl.com/y5erxlvn   🎵🎵
 *लेखक :  रवींद्रनाथ टागोर*    
   
═══════════════
      *🇮🇳 प्रतिज्ञा* 🇮🇳 ══════════════     
*भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.*..........
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी* 
 ═══════════════       https://tinyurl.com/yyb84px8🎵🎵  
                        ═══════════════      
 *📙संविधान 📙*  ══════════════              
      *आम्ही,भारताचे लोक...*
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet 🎶 ════════════════          
    *📙📚सुविचार📙*  
════════════════    
*कृतीमुळे माणूस यशस्वी होतो. कृतीमुळे परिणाम घडून येतात. ज्ञान ही शक्ती आहे असं म्हणतात पण ते अर्धसत्य आहे कारण ज्ञानाला कृतीत उतरवल्याशिवाय ज्ञानाचा उपयोग नाही.*
        *🎗संकलन🎗*
      *श्रीम.मनिषा पांढरे*  
          ═══════════════                                          
 *💫💠प्रार्थना 💠💫*
════════════════  

*असो तुला देवा माझा*

*असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार*
*तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥*

*तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची*
*तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची*
*तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार*
*असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥*

*तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची*
*तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची*
*तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार*
*असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥*

*तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल*
*तरि प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल*
*तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार*
*असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥*

🎗️ *संकलन-*🎗️
*सौ. सुपेकर कल्पना*
*अ. नगर*
═══════════════
  *🎼🌼श्लोक🌼🎼* 
═══════════════
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी
सुखाची स्वयें सांडी जीवी करावी
देहेदु:ख ते सुख मानीत जावे
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे      ||१०||
*अर्थ:-* 
         नेहमी श्रीरामाबद्दल प्रेम बाळगावे. सुखोपभोग टाळावा. देहाला पडणाऱ्या कष्टात सुख मानीत जावे आणि मनात नेहमी सारासार विवेक भरलेला असावा.
✍ *संकलन* ✍
 *श्री संजय राठोड नांदेड*
═══════════════
*❇ ⚛सुभाषित⚛❇*   
═══════════════
*अपूर्वः कोपि कोशोयं विद्यते तव भारति*।
*व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात* ।।

*अर्थ:-*
हे देवी शारदे, तुझा (विद्यांचा) खजिना अपूर्व आहे, खर्च करण्याने त्यात भर पडते आणि साठवून ठेवण्याने त्यात घट होते.
आपल्याकडे असलेली विद्या इतरांना देत असतांना ती अधिक पक्की होते आणि कुणालाही न देता आपल्याजवळच राखून ठेवली तर ती विस्मरणात जाऊ शकते.

🎗️ *संकलन*🎗️
*सौ.वैशाली शिंदे*
*लातूर*
════════════════ 
💥 *आजचे पंचांग*💥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹 *दिन*- १६/०३/२०२०
🌺 *वार*- सोमवार 
🏵 *फाल्गुन* कृ. ०८
⚡ *तिथी* -कृ. अष्टमी 
🌻 *श्री शालिवाहन शके* - १९४१
♦ *विक्रम संवत्सर* - विकारीनाम  
🌳 *ऋतू* - शिशिर 
🌓 *पक्ष* - कृष्ण 
🔹 *योग* - सिद्धी
💠 *करण* - बालव
⭐ *नक्षत्र* - जेष्ठा 
🔆 *सुर्योदय*- ०६.४६
🌞 *सुर्यास्त* - ०६.४९
       🎗️ *संकलन* 🎗️
*श्री.किशोर सोनवणे सर नंदुरबार*                                                   
  
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*🎯म्हणी व अर्थ🎯*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*अपापाचा माल गपापा*

_लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते._

✍ *संकलन*✍
*श्री.समाधान अहिरे, मालेगाव नाशिक*
9881181615                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖
 🌎 *सामान्य ज्ञान*🌎
➖➖➖➖➖➖➖➖
1)जीवनातील सर्व व्यवहार कशावर अवलंबून आहे?                                                               *भाषेवर*              
2)कोरोना वायरसविषयी अफवा रोखण्यासाठी राज्यात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे?
  *आपत्ती व्यवस्थापन कायदा*
3) 2020 - 21 ची जनगणना ही कितवी जनगणना आहे?
*16 वी*

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
     *श्री उमेश राठोड*
      *दिग्रस यवतमाळ*              *9921454162*
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚📕• इंग्रजी शब्दार्थ •📕📚*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
१) Things (थिग्ज्) वस्तू
२) Eraser (इरेझर्) खोडरबर
३) Spoon (स्पून्) चमचा
४) Bowl (बोल्) वाटी
५) Dish (डिश्) थाळी
          *✍ संकलन ✍*
 *श्री. दिपक कोळी सर (सहशिक्षक)*
 *जि.प.प्रा.शा.वाकद केंद्र शेलगाव ता.कन्नड जि.औरंगाबाद*
*मो. नं. 9545960346*          
           *9689622267*            
*ईमेल:-* dkoli978@gmail.com
════════════════ 
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
             *🌐दिनविशेष🌐*
     🔹 *⚜ 16 मार्च⚜*🔹      ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
  हा या वर्षातील ७५ वा (लीप वर्षातील ७६ वा) दिवस आहे.
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹  महत्त्वाच्या घटना 🔹* ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
  ▪️२००१ : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान
▪️२००० : हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर
▪️१९७६ : इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
▪️१९६६ : अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
▪️१९४५ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
▪️१९४३ : ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.
▪️१६४९ : शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
▪️१५२८ : फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला. [चैत्र शु. १४]
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹* ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️१९३६ : भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू: २६ जुलै २००९)
▪️१९२१ : फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)
▪️१९०१ : प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १२ जून १९८१)
▪️१७८९ : जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जुलै १८५४)
▪️१७५१ : जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ जून १८३६)
▪️१७५० : कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असुन तिने ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८)
▪️१६९३ : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू: २० मे १७६६)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹* ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪️२००७ : मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म: ४ मे १९८४)
▪️१९९९ : कुमुदिनी पेडणेकर – गायिका (जन्म: ? ? ????)
▪️१९९९ : कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्‍या लेखिका (जन्म: ? ? ????)
▪️१९९० : वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: २१ जुलै १९१०)
▪️१९४६ : ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म: १० ऑगस्ट १८५५)
▪️१९४५ : गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म: १३ जून १८७९)

⭕  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
        *✍श्री.महेश पराड*
            *भिवंडी महानगरपालिका, ठाणे*   
🔹➖➖🔹➖➖🔹➖➖🔹
♦ *💠💠बोधकथा💠💠*♦
  ▪┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ▪
     *बोका आणि कोल्हा*
एका अरण्यातील झाडाखाली एक बोका व एक कोल्हा बोलत बसले होते. कोल्हा म्हणाला, 'अरे बोकोबा, कदाचित आपल्यावर जर एखादं संकट आलं तर हजार युक्त्या करून मी त्यातून निभावून जाईन पण तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते.'

बोका म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एकच युक्ती माहीत आहे. तेवढी चुकली तर मात्र माझी काही धडगत नाही. कोल्हा म्हणाला, 'बाबा रे, तुझी मला फारच काळजी वाटते. अरे, एक दोन युक्त्या मी शिकवल्या असत्या पण आजचा काळ असा आहे की ज्यानं त्यानं आपल्या स्वतःपुरतं पहावं. दुसर्‍याच्या उठाठेवी करू नयेत. बरं तर येतो मी. रामराम !' इतके बोलून कोल्हा निघाला तोच मागून शिकार्‍याची कुत्री धावत आली. बोक्याला झाडावर चढता येत असल्याने तो पटकन् झाडावर चढला. पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही त्याच्या उपयोगी पडली नाही. तो घाबरून थोडसा पुढे पळत नाही तोच शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडले.

*तात्पर्य - दुसर्‍यापेक्षा मी अधिक शहाणा अशी बढाई मारणार्‍यास त्याचे शहाणपण वेळेवर उपयोगी पडत नाही. पण ज्याला तो कमी शहाणा समजतो त्याचेच शहाणपण वेळेला उपयोगी पडते. एखाद्याला एकच विद्या चांगली येत असेल तर तिच्यामुळे जे काम होईल ते अनेक अपुर्‍या विद्यापासून होणार नाही.*

*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
════════════════ 
     *🇮🇳समुहगीत🇮🇳*
════════════════
*🇮🇳बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो🇮🇳*

*हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले*
*राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो*

*वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन*
*तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो*

*हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून*
*ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो*

*करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ*
*विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो*

*या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ*
*हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो*

*ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल*
*जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो*
*कवी : साने गुरुजी*
════════════════════
*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी* 
♾➖♾➖♾➖♾➖♾➖♾
 🕉 *पसायदान*🕉                              
♾➖♾➖♾➖♾➖♾➖♾
🌞 *आता विश्वात्मके*🌞
*आतां विश्वात्मकें देवें।* 
*येणें वाग्यज्ञें तोषावें।* 
*तोषोनी मज द्यावें।* 
*पसायदान हें॥ १ ॥*
  *संत ज्ञानेश्वर महाराज*
 ▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬ 
 *💮शालेय परिपाठ प्रमुख*  
*श्री संजय राठोड*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
 *🔹परिपाठ एडिटर🔹*
*श्री संजय राठोड*
*श्री महेश पराड* 
*श्री समाधान अहिरे*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*♦परिपाठ आयोजक♦*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे*
 *9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ*
 *9420148419*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹उप.मुख्य पर्यवेक्षक🔹* 
      *श्री महेश पराड* 
         *9271585830*
  *श्री कृष्णा कालकुद्रिंकर*
      *9420355139*
    *श्री महेश कोठावळे*
    *96730 63747*

〰〰〰〰🎀〰〰〰〰
💠 *उप.मुख्य प्रशासक*💠 
      *श्री.ओंकार भोई सर*
          *9922021066*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
  💠 *मुख्य प्रशासक*💠
   *श्री.भालचंद्र भोळे सर* 
        *9545482635*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
  🌐 *समुहप्रमुख*🌐
    *श्री.नितीन केवटे सर*
       *9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जित रजा अर्ज नमुना / Arjit Raja Arj ,form ,format

 https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk