मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

दैनंदिन परिपाठ मराठी दिनांक 17 डिसेंबर 2019

▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
       ➖📡🆃🆂🆂📡➖
          
 ❱❱ *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र* ❰❰
 ▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻शालेय मराठी परिपाठ♻*
       🗓 *वार - मंगळवार*
 *दिनांक - 17/12/2019*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬

     🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगीत*🇮🇳🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖
         *जन गण मन*                                   
*जन-गण-मन अधिनायक जय हे भारत  भाग्य विधाता...*              

*कवि- रविंद्रनाथ टागोर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
 🔊https://tinyurl.com/y5erxlvn 🔊 *राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio 🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
     🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत....*

*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge  🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳* 
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬  
*आम्ही भारताचे लोक....* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
 
♾➖♾➖♾➖♾➖♾
  ⭕💫 *प्रार्थना*💫⭕
♾➖♾➖♾➖♾➖♾  
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
  *देह मंदिर चित्त मंदिर* 

*देह मंदिर चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना |*
*सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||*

*दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना*
*वेदना जाणावयाला जागवू संवेदना*
*दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना ||१||*

*जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना*
*सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना*
*शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना ||२||*

*भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना*
*मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना*
*मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना ||३||*

*संकलन-*
*सौ. सुपेकर कल्पना अ.नगर*
 
♾➖♾➖♾➖♾➖♾
*_❇सुभाषित❇_*
♾➖♾➖♾➖♾➖♾ 
*चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः |*
*कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चला मतिः ||*

*अर्थ:-*
           [जरी पर्वत वादळामुळे हलत नसले तरी] प्रलय काळातील झंझावातामुळे ते [सुद्धा] डळमळले तर खुशाल घसरू देत पण धैर्यवान; बुद्धिमान लोकांची स्थिर बुद्धी कुठल्याहि संकटात विचलित होत नाही.

*✍🏻✒संकलन🖊✍🏻* 
  *श्रीम. वैशाली शिंदे लातूर 9422637352* ════════════════════
        *❇🌻दोहा*🌻❇
════════════════════
_*नमो धर्मविपाकाय नम: सुकृतसाक्षिणे ।*_
_*नम: प्रत्यक्षदेवाय भास्कराय नमो नम: ।।*_

*अर्थ :-* 
           _धर्मापासून उत्पन्न झालेल्या, चांगल्या कृत्यांचा साक्षी असलेल्या, प्रत्यक्ष दिसणार्‍या श्रीभास्कराला माझा नमस्कार असो._

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
  *श्री.संजय राठोड नांदेड* 

〰〰〰〰〰〰〰〰〰
*⚛♻पंचांग♻⚛*
〰〰〰〰〰〰〰〰〰
दिनांक - 17/12/2019
वार- मंगळवार 
मार्गशीर्ष -  कृ. ०६
तिथी-  कृ. षष्ठी 
नक्षत्र - मघा 
योग- विष्कंभ
करण- गरज 
सुर्योदय- ०७. ०५
सुर्यास्त - ०६.०४
विक्रम संवत- २०७६
शक संवत- १९४१

*✍🏻✒संकलन🖊✍🏻* 
  *श्री किशोर सोनवणे सर 9860915360* 
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥💲 *सुविचार*💲💥 
〰〰〰〰〰〰〰〰〰
*माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यवर अवलंबून असते.*

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*                   
   *श्रीम. मनिषा पांढरे*                                      
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 💧🌀 *म्हणी व अर्थ*🌀💧
〰〰〰〰〰〰〰〰〰
_*चिंती परा येई घरा*_

      _दुसर्‍याबद्दल मनात वाईट विचार आले की स्वत:चेच वाईट होते._

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*                   
   *श्री.समाधान अहिरे निंबायती ता.मालेगाव 9881181615*   
〰〰〰〰〰〰〰〰〰
 🌎 *सामान्य ज्ञान*🌎
  〰〰〰〰〰〰〰〰〰
    1) कोणता महासागर सर्वात मोठा आहे?
 *:- पॅसिफिक महासागर* 
2) कोणत्या शहराला सात टेकड्यांचे शहर म्हणतात?
 *:- रोम* 
3) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
 *:-  चंद्रपूर* 
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯   
 *उमेश राठोड* 
*दिग्रस यवतमाळ*                            *9921454162*      https://youtu.be/md_n8z22NQ8 

➖➖➖➖➖➖➖➖➖ 
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
             *🌐दिनविशेष🌐*
     🔹 *⚜ १७ डिसेंबर⚜*🔹
        ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
     ▪हा या वर्षातील ३५१ वा (लीप वर्षातील ३५२ वा) दिवस आहे.
▪ सेवानिवृत्त दिन.
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹  महत्त्वाच्या घटना 🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
▪१९७० : जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
▪१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन
▪१९२८ : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
▪१९२७ : हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
▪१७७७ : फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
▪१७१८ : ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.   

*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१९७८ : रितेश देशमुख – अभिनेता
▪१९७२ : जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल
▪१९४७ : दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
▪१९२४ : गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)
▪१९११ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)
▪१९०५ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०) (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)
▪१९०१ : यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)
▪१९०० : मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (मृत्यू: ३ एप्रिल १९९८)
▪१८४९ : लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. (मृत्यू: १८ आक्टोबर १९०९)
▪१७७८ : सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ मे १८२९)

*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪२०१० : देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)
▪२००० : जाल पारडीवाला – अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक (जन्म: ? ? ????)
▪१९८५ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४)
▪१९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. (जन्म: ३० मार्च १९०६)
▪१९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८८० - गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)
▪१९५६ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (जन्म: २३ जानेवारी १८९८)
▪१९३८ : चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (जन्म: ११ आक्टोबर १८७६ - चांचल, माल्डा, बांगला देश)
▪१९३३ : थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
▪१९२७ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (जन्म: २३ जून १९०१)
▪१९०७ : लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (जन्म: २६ जून १८२४)
१७४० : चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला.  
⭕  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
        *✍श्री.महेश पराड*
            *भिवंडी महानगरपालिका, ठाणे*   
           ════════════════════
*🌐🌐बोधकथा🌐🌐*
════════════════════  
 *म्हातारीची खीर*

एका गावात एक वृद्ध महिला राहत होती, तिच्या कंजुशीची चर्चा गावभर होती, एका मुलाने तिला याबद्दल अद्दल घडविण्याचे ठरविले. तो त्या महिलेच्या घरी गेला व तिला तिचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू लागला. तिने त्याला नाते असण्याचे नाकारले. कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला असता ना!. बाहेर खूप पाऊस पडत होता. होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या मुलाने तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिने त्याला घरात प्रवेश तर दिला पण मुलगा काही खायला मागेल म्हणून ती म्हणाली, माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही, तेंव्हा गुपचूप पडून राहा. तेंव्हा तो मुलगा म्हणाला, आजी मी तुला काहीच खायला मागणार नाही कारण माझ्याकडे जादूची छडी आहे. तिच्या सहाय्याने मला काय पाहिजे ते बनविता येते. तू फक्त मला चूल, पातेले आणि पाणी दे, मी छडीच्या सहाय्याने आज खीर खाणार आहे. पाहिजे तर तुला पण खायला देतो. महिलेने पण खूप दिवसात खीर खाल्ली नव्हती. त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. काही वेळाने आपल्या जवळची छडी काढून त्याने त्या पाण्यातून फिरवली व त्या पाण्याची चव घेतली व म्हणाला, आजी खीर खूप छान झाली आहे पण यात जर तांदूळ आणि साखर असती तर ना खूप मज्जा आली असती. महिलेने विचार केला थोडे तांदूळ आणि साखर दिली तर काय बिघडते. तिने दिले. त्याने थोड्या वेळाने परत अजून दुध, वेलची आणि सुका मेवा मागितला. महिलेने खिरीच्या लोभापायी तो दिला. खीर तयार झाली. महिलेने व त्या मुलाने एकत्र बसून खाल्ली. महिलेने हा जादूच्या छडीचा चमत्कार मनाला व मुलाने कंजूष महिलेच्या घरी खीर खाल्ली.

▪ *तात्पर्य*▪
*बुद्धीच्या जोरावर संकटकाळातही आपण आपले काम सध्या करू शकतो.*

*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
   
〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻♻समुहगीत*♻♻
════════════════════
*🇮🇳बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो🇮🇳*

*बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो*
*हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले*
*राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो*

*वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन*
*तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो*

*हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून*
*ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो*

*करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ*
*विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो*

*या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ*
*हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो*

*ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल*
*जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो*
*कवी : साने गुरुजी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
Bncmc School no 93, *चाविन्द्रा भिवंडी*
➖➖➖➖➖➖➖➖➖      
 🕉 *पसायदान*🕉   

 ➖➖➖➖➖➖➖➖➖       
*आतां विश्वात्मकेंदेवें।*  
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
https://tinyurl.com/Pasaydan-Student  
🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬ 
 *💮शालेय परिपाठ प्रमुख-*  
*श्री संजय राठोड सर*
*9881268233*

♻♻♻♻♻♻♻
 *परिपाठ एडिटर*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
 *श्री महेश पराड* 
*9271585830*
*श्री समाधान अहिरे*
*9881181615*

✍✒🖊📝

*परिपाठ आयोजक-*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
 *9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
 *9420148419*
*श्री.विश्वंभर बोकडे सर*
*9552171724*
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
*श्रीम गीतांजली गजबे*
*7776036919*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
📱📱📱📱📱📱📱

  💠 *मुख्य प्रशासक*💠
   *श्री.भालचंद्र भोळे सर* 
*9545482635*
  🌐 *समुहप्रमुख*🌐
    *श्री.नितीन केवटे सर*
 *9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जित रजा अर्ज नमुना / Arjit Raja Arj ,form ,format

 https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk