सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

दैनंदिन परिपाठ मराठी दिनांक 16 डिसेंबर 2019

▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
       ➖📡🆃🆂🆂📡➖
          
 ❱❱ *तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र* ❰❰
 ▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻शालेय मराठी परिपाठ♻*
       🗓 *वार - सोमवार*
 *दिनांक - 16/12/2019*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬

     🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगीत*🇮🇳🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖
         *जन गण मन*                                   
*जन-गण-मन अधिनायक जय हे भारत  भाग्य विधाता...*              

*कवि- रविंद्रनाथ टागोर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
 🔊https://tinyurl.com/y5erxlvn 🔊 *राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio 🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
     🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत....*

*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge  🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳* 
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬  
*आम्ही भारताचे लोक....* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
 
♾➖♾➖♾➖♾➖♾
  ⭕💫 *प्रार्थना*💫⭕
♾➖♾➖♾➖♾➖♾  

_*गगनसदन तेजोमय*_

*गगन, सदन तेजोमय*
*तिमिर हरून करुणाकर*
*दे प्रकाश, देई अभय*

*छाया तव, माया तव*
*हेच परम पुण्यधाम*
*वार्यातून, तार्यांतुन*
*वाचले तुझेच नाम*
*जगजीवन, जनन-मरण*
*हे तुझेच रूप सदय*

*वासंतिक कुसुमांतून*
*तूच मधुर हासतोस*
*मेघांच्या धारांतुन*
*प्रेमरूप भासतोस*
*कधि येशील चपलचरण*
*वाहिले तुलाच हृदय*

*भवमोचन हे लोचन*
*तुजसाठी दोन दिवे*
*कंठातील स्वर मंजुळ*
*भावमधुर गीत नवे*
*सकलशरण, मनमोहन*
*सृजन तूच, तूच विलय*

🔹 *संकलन* 🔹
*सौ. सुपेकर कल्पना*
*अ. नगर*

♾➖♾➖♾➖♾➖♾
*_❇सुभाषित❇_*
♾➖♾➖♾➖♾➖♾ 

*वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छकस्य विशेषत* |

*प्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत्* ||

*अर्थ :*
      ज्याचा [आपल्यावर] विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला [त्याबद्दल] विचारलेले आहे अशा [माणसालाच उपदेश] सांगावा पण विश्वास नसणाऱ्याला सांगितले तर ते कष्ट व्यर्थ जातील.

*✍🏻✒संकलन🖊✍🏻* 
  *श्रीम. वैशाली शिंदे लातूर 9422637352* ════════════════════
        *❇🌻दोहा*🌻❇
════════════════════
*मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे ।*
*अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम: ॥*

*अर्थ :-*
         मृत्युंजय (मृत्यूवर ज्याने विजय मिळवलेला आहे असा), रुद्र (असुरांना ज्याची भीती वाटते असा), नीलकण्ठ (ज्याचा कंठ निळा आहे असा), शम्भु (कल्याणकारी), अमृतेश (अमृताचा स्वामी), शर्व (मंगलमय), महादेव (देवांमध्ये श्रेष्ठ) अशी विविध नावे असलेल्या भगवान शंकराला मी वंदन करतो.

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*
  *श्री.संजय राठोड नांदेड* 

〰〰〰〰〰〰〰〰〰
*⚛♻पंचांग♻⚛*
〰〰〰〰〰〰〰〰〰
दिनांक - 16/12/2019
वार- सोमवार 
मार्गशीर्ष -  कृ. ०५
तिथी- कृ. पंचमी 
नक्षत्र - आश्र्लेषा 
योग-वैध्रुती 
करण-कौलव 
सुर्योदय-०७. ०४
सुर्यास्त ०६.०४
विक्रम संवत-२०७६
शक संवत-१९४१

*✍🏻✒संकलन🖊✍🏻* 
  *श्री किशोर सोनवणे सर 9860915360* 
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥💲 *सुविचार*💲💥 
〰〰〰〰〰〰〰〰〰
*संयम हा सर्व दु:खावरील इलाज आहे*.

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*                   
   *श्रीम. मनिषा पांढरे*                                      
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 💧🌀 *म्हणी व अर्थ*🌀💧
〰〰〰〰〰〰〰〰〰
*घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात.*
एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.

*✍🏻✒संकलन🖊✍🏻*   
*श्री.समाधान अहिरे निंबायती ता.मालेगांव नाशिक 9881181615*
〰〰〰〰〰〰〰〰〰
 🌎 *सामान्य ज्ञान*🌎
  〰〰〰〰〰〰〰〰〰
     
1) महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
 *:- अहमदनगर* 
2) महाराष्ट्राला  किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
 *:- 720 कि.मी.* 
3) नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
 *:-  गोंदिया* 
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯   
 *उमेश राठोड* 
*दिग्रस यवतमाळ*                            *9921454162*      https://youtu.be/md_n8z22NQ8
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
             *🌐दिनविशेष🌐*
     🔹 *⚜ १६ डिसेंबर⚜*🔹
        ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
     ▪हा या वर्षातील ३५० वा (लीप वर्षातील ३५१ वा) दिवस आहे.
▪ बांग्लादेश चा स्वातंत्र्यदिन.
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹  महत्त्वाच्या घटना 🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
▪१९९१ : पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
▪१९८५ : कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
▪१९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
▪१९४६ : थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
▪१९३२ : ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
▪१९०३ : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
▪१७७३ : अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
▪१४९७ : वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.   

*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१९१७ : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू: १९ मार्च २००८)
▪१८८२ : जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
▪१७७५ : जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७)
▪१७७० : लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू: २६ मार्च १८२७)

*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ 
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪२००४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
▪२००० : सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती. (जन्म: ? ? १८९९)
▪१९८० : कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०) 
▪१९६५ : डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (जन्म: २५ जानेवारी १८७४) 
▪१९६० : चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)

⭕  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
        *✍श्री.महेश पराड*
            *भिवंडी महानगरपालिका, ठाणे*   
      ════════════════════
*🌐🌐बोधकथा🌐🌐*
════════════════════  
 
     *कोळी आणि मासा*

एका गावात एक कोळी राहत होता. रोज समुद्रात जाऊन मासे पकडायचे आणि बाजारात जाऊन विकायचे हाच त्याचा दिनक्रम होता. पण एके दिवशी काही केल्या त्याच्या जाळ्यात काही मासे सापडेनात. तो हैराण झाला. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार झाला. तो कंटाळला. त्याला काही सुचेना. तिसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला मग मात्र त्याच्या मनाची घालमेल होवू लागली. मनाशी म्हणाला,''आता जर समुद्रात मासे मिळाले नाहीत तर मी काही समुद्रावर येणार नाही." असे ठरवून त्याने जाळे समुद्रात टाकले. यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली. एक छोटा का होईना मासा त्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जाळे वर ओढताच मासाही वर आला व मनुष्यवाणीत बोलू लागला. काकुळतीला येवून तो मासा म्हणाला,'' मी तुझ्या पाया पडतो पण मला सोडून दे. मी आत्ता खूप लहान आहे. मी मोठा होईन तेंव्हा तू मला पकड. मला परत समुद्रात जावू दे". कोळी म्हणाला," अरे मत्स्या ! काय माहित तू मला परत सापडशील कि नाही, आणि आज तुला जर नेले नाही तर मी आणि माझ्यावर अवलंबून असलेले लोक मात्र उपाशी मारतील. तेंव्हा तुला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही."

▪ *तात्पर्य*▪
*भविष्यात मोठे घबाड मिळेल या आशेवर आता हाती आलेली संधी सोडणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय.*

*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻♻समुहगीत*♻♻
════════════════════
*🇮🇳बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो🇮🇳*

*बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो*
*हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले*
*राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो*

*वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन*
*तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो*

*हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून*
*ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो*

*करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ*
*विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो*

*या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ*
*हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो*

*ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल*
*जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो*
*कवी : साने गुरुजी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
Bncmc School no 93, *चाविन्द्रा भिवंडी*
➖➖➖➖➖➖➖➖➖      
 🕉 *पसायदान*🕉   

 ➖➖➖➖➖➖➖➖➖       
*आतां विश्वात्मकेंदेवें।*  
➖➖➖➖➖➖➖➖➖ 
https://tinyurl.com/Pasaydan-Student  
🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬ 
 *💮शालेय परिपाठ प्रमुख-*  
*श्री संजय राठोड सर*
*9881268233*

♻♻♻♻♻♻♻
 *परिपाठ एडिटर*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
 *श्री महेश पराड* 
*9271585830*
*श्री समाधान अहिरे*
*9881181615*

✍✒🖊📝

*परिपाठ आयोजक-*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
 *9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
 *9420148419*
*श्री.विश्वंभर बोकडे सर*
*9552171724*
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
*श्रीम गीतांजली गजबे*
*7776036919*
*श्रीम क्रांती महिरे*
*7447365876*
📱📱📱📱📱📱📱

  💠 *मुख्य प्रशासक*💠
   *श्री.भालचंद्र भोळे सर* 
*9545482635*
  🌐 *समुहप्रमुख*🌐
    *श्री.नितीन केवटे सर*
 *9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अर्जित रजा अर्ज नमुना / Arjit Raja Arj ,form ,format

 https://drive.google.com/file/d/1QtXIrqT1Fz6jjgz1PeKEhDg4lt6xKY38/view?usp=drivesdk