▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
➖📡🆃🆂🆂📡➖
*तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र*
▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬▬
*♻♻शालेय परिपाठ♻♻*
🗓 *वार -मंगळवार*
*दिनांक -- 03/12/2019*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
🇮🇳🇮🇳 *राष्ट्रगीत*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*जन गण मन।*
*जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता।।*
*कवि- रविंद्रनाथ टागोर*
🔊https://tinyurl.com/y5erxlvn 🔊
*राष्ट्रगीत संगीतसह* 🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔊https://tinyurl.com
/Rashtrageet Without music audio 🔊🎶🎶
➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳🇮🇳 *प्रतिज्ञा*🇮🇳🇮🇳
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत*...
*लेखक - व्यंकट सुब्बाराव पेदेमरी*
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Hindi-Pledge 🎶🎶
〰〰〰〰〰〰〰〰〰
*✳संविधान (प्रास्ताविक)✳*
▬▬▬▬▬▬❚❚▬▬▬▬▬▬
*आम्ही , भारताचे लोक .* ...
〰〰〰〰〰〰〰〰〰
https://tinyurl.com/Sanvidhan-Geet
➖➖➖➖➖➖➖➖➖
*💫💠प्रार्थना 💠💫*
🌼➖🌼➖🌼➖🌼➖🌼
*देह मंदिर चित्त मंदिर*
*देह मंदिर चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना |*
*सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||*
*दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना*
*वेदना जाणावयाला जागवू संवेदना*
*दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना ||१||*
*जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना*
*सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना*
*शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना ||२||*
*भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना*
*मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना*
*मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना ||३||*
*🎗संकलन🎗*
*सौ. सुपेकर कल्पना अ.नगर*
⭕♾⭕♾⭕♾⭕♾⭕
*🎼🌼श्लोक🌼🎼*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।*
*गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥*
*अर्थ*:-
गुरु आदी म्हणजे प्रथमपासून आहे, सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. पण गुरूंना स्वतःला दुसरे उगमस्थान नाही. गुरुतत्त्व स्वयंभू आहे. गुरुच परम दैवत आहे. गुरुंहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. अशा श्रीगुरुंना माझा नमस्कार असो.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*❇ ⚛सुभाषित⚛❇* 🔹〰🔹🔹〰〰🔹〰🔹
*वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छकस्य विशेषतः* |
*प्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत*् ||
*अर्थ* : ज्याचा [आपल्यावर] विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला [त्याबद्दल] विचारलेले आहे अशा [माणसालाच उपदेश] सांगावा पण विश्वास नसणाऱ्याला सांगितले तर ते कष्ट व्यर्थ जातील.
*✍🖋संकलन🖋*
✍ *श्री. वैशाली शिंदे लातूर 9422637352* ════════════════════
⚛⭐ *पंचाग*⭐⚛
════════════════════
दिनांक - 03/12/2019
वार-मंगळवार
मार्गशीर्ष - शु. ०७
तिथी- शु. सप्तमी
नक्षत्र - धनिष्टा
योग-व्याघात
करण-गरज
सुर्योदय-०६.५६
सुर्यास्त ०६.००
विक्रम संवत-२०७६
शक संवत-१९४१
*🖋संकलन🖋*
✍ *श्री. किशोर सोनावणे* ✍ ════════════════════
⚛⭐ *सुविचार*⭐⚛ ════════════════════
*विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.*
*✍🖋संकलन🖋*
✍ *श्रीमती मनिषा पांढरे* ✍
════════════════════
*🎯म्हणी व अर्थ🎯*
♾♾💲♾🌹♾💲♾♾
*अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी*
_मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते._
(🐈 आणि 🐕)
✍ *संकलन*✍
*श्री.समाधान अहिरे, मालेगाव नाशिक*
9881181615
♾♾💲♾🌹♾💲♾♾
🌎 *सामान्य ज्ञान*🌎
════════════════════
1) रॉकेट म्हणून कोणाला ओळखले जाते?
*:- के. सिवन*
2) डोळ्या या ज्ञानेंद्रियामार्फत किती टक्के ज्ञानाची प्राप्त होते?
*:- 83 टक्के*
3)भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?
*:- मीरा कुमार*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*उमेश राठोड*
*दिग्रस यवतमाळ* *9921454162* https://youtu.be/md_n8z22NQ8
════════════════════
⭕┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🌐दिनविशेष🌐*
🔹 *⚜ ३ डिसेंबर ⚜*🔹
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪ *हा या वर्षातील ३३७ वा (लीप वर्षातील ३३८ वा) दिवस आहे.*
▪ *जागतिक विकलांग दिन*
〰〰〰〰🎀〰〰〰〰
*🔹 महत्त्वाच्या घटना 🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
▪१९८४ : भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
▪१९७९ : आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
▪१९७१ : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
▪१९६७ : डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
▪१८७० : ’बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅश्युअरन्स सोसायटी’ या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
▪१८२९ : लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
▪१८१८ : इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.
▪१७९६ : दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
*🔹 जन्मदिवस / जयंती🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪१८९२ : माधव केशव काटदरे – निसर्गकवी (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)
▪१८८९ : खुदिराम बोस – क्रांतिकारक (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)
▪१८८४ : डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)
▪१८८२ : जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले. (मृत्यू: १६ एप्रिल १९६६)
▪१७७६ : हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (मृत्यू: २८ आक्टोबर १८११)
*🔹मृत्यू / पुण्यतिथी/ स्मृतीदिन🔹*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
〰〰〰〰🎀〰〰〰〰
▪२०११ : देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)
▪१९७९ : मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)
▪१९५१ : बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)
▪१८९४ : आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)
▪१५५२ : सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे. (जन्म: ७ एप्रिल १५०६ - झेविअर, स्पेन)
⭕ ┄─┅━━▣▣▣━━┅─┄ ⭕
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री.महेश पराड*
*भिवंडी महानगरपालिका, ठाणे*
════════════════════
*📖📖बोधकथा📖📖*
════════════════════
*चहाड्या केल्याची सजा*
नसिरूद्दीन हैदर अयोध्येचे नवाब होते. अत्यंत उदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. परंतु त्यांच्यात एक अवगुण होता. ते लोकांच्या सांगण्यावर चटकन विश्वास ठेवत असत. त्यांच्या या स्वभावाचा फायदा त्यांचा हुसेनी नावाचा नोकर उचलत असे. तो नवाबाचे पाय रात्री दाबत असताना ज्यांच्यावर तो नाराज असे त्या लोकांच्या खोट्या तक्रारी करत असे. हुसेनीच्या अशा सवयीमुळे नवाबाचे दिवाण व अन्य लोक त्याच्यावर नाराज होते. नवाबाच्या दिवाणांचे नाव होते फैजल खान. एकदा त्यांनी हुसेनीला कानपूरला पाठविले व त्याला तेथे अटकही केली. दुस-या दिवशी नवाबसाहेबांना हुसेनीचे निधन साथरोगाने झाल्याचा निरोप पाठविला. काही महिन्यानंतर हुसेनी जेलमधून पळाला त्याने नवाबसाहेबांना भेटून सर्व कहाणी सांगितली. तिकडे दिवाणांना हुसेनी भेटल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सर्व कर्मचा-यांना एक युक्ती सांगितली. जेव्हा नवाबसाहेबांनी पहारेक-यास विचारले,याला ओळखतोस काय. पहारेक-याने ते एक भूत असल्याचे सांगितले. इतर कर्मचा-यांनीही त्याचीच री ओढली व हुसेनीला जिवंतपणीच भूत ठरवून त्याच्या खोटेपणाला खोटेपणाचेच प्रत्युत्तर दिवाणसाहेबांनी दिले.
वर्तमानपत्रातून संग्रहित
▪ *तात्पर्य*▪
*चहाडी करणे, लोकांच्या मनात किंतू निर्माण करणे किंवा अफवा पसरवणे या वाईट गोष्टी आहेत. यापासून मानवाने दूरच राहिले पाहिजे.*
*✍✒संकलन🖊✍*
*श्री कृष्णा कालकुंद्रीकर सिंधुदुर्ग*
📱9420355139📱
krishnalove5139@gmail.com
*शाळा आंबेरी वाक ता - मालवण*
════════════════════
*🇮🇳समुहगीत🇮🇳*
════════════════════
*🔮तू नव्या जगाची आशा🔮*
*तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा !*
*तपोवनातून तुझ्या उजळली, उपनिषदांची वाणी*
*मातीमधुनी तुझ्या जन्मल्या, नररत्नांच्या खाणी*
*जय युग धैर्याच्या देशा, जय नव सूर्याच्या देशा*
*बळापुढेवा छळापुढे, नच इथे वाकल्या माना*
*अन्यायाला भरे कापरे, बघुनी शूर अभिमाना*
*जय आत्मशक्तीच्या देशा,*
*जय त्यागभक्तीच्या देशा*
*श्रमातुनी पिकलेली शेते, पहा डोलती धुंद*
*घामाच्या थेंबातून सांडे, हृदयातील आनंद*
*जय हरितक्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा*
*पहा झोपड्या कंगालांच्या थरथरत्या भवताली*
*अन्यायाला जाळीत उठल्या, झळकत लाख मशाली*
*जय लोक शक्तीच्या देशा. जय दलितमुक्तीच्या देशा*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*✍✒संकलन🖊✍*
*श्री भालचंद्र भोळे, ठाणे*
9545482635
gouritanay4@gmail.com
bncmcschool093@gmail.com
*Bncmc School no 93, चाविन्द्रा, भिवंडी*
════════════════════
🕉 *पसायदान*🕉
♾➖♾➖♾➖♾
🌞 *आता विश्वात्मके*🌞
*आतां विश्वात्मकें देवें।*
*येणें वाग्यज्ञें तोषावें।*
*तोषोनी मज द्यावें।*
*पसायदान हें॥ १ ॥*
*- संत ज्ञानेश्वर महाराज*
▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬
*💮शालेय परिपाठ प्रमुख💮*
*श्री संजय राठोड नांदेड*
♻♻♻♻♻♻♻
*परिपाठ एडिटर*
*श्री संजय राठोड*
*9881268233*
*श्री महेश पराड*
*9271585830*
*श्री समाधान अहिरे*
*9881181615*
✍✒🖊📝
*परिपाठ आयोजक-*
*🔸मुख्य पर्यवेक्षक🔸*
*श्री.समाधान अहिरे सर*
*9881181615*
*श्री.नितीन गुंजाळ सर*
*9420148419*
*श्री.विश्वंभर बोकडे सर*
*9552171724*
*श्री.ओंकार भोई सर*
*9922021066*
*श्रीम गीतांजली गजबे मॅम*
*7776036919*
*श्रीम क्रांती महिरे मॅम*
*7447365876*
📱📱📱📱📱📱📱
💠 *मुख्य प्रशासक*💠
*श्री.भालचंद्र भोळे सर*
*9545482635*
🌐 *समुहप्रमुख*🌐
*श्री.नितीन केवटे सर*
*9527311125*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र*
🎯🗝 *धरूनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा